जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । उज्जैन हुन शेगावला जाणारी बस क्रमांक एम.पी.पी.१३४३ हिचा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील करकी फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात वाहक जागीच ठार झाला तर 15 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. दोन जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.
अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेश मधील उज्जैन येथून शेगावला जाणारी मध्य प्रदेश परिवहन मंडळाची बस गुरुवारी सायंकाळी ६:३०च्या सुमारास कर्की फाट्याजवळ चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने शेतात जाऊन उलटली. ही घटना इतकी भीषण होती की या अपघातात वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर 15 प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक सांगितली जात आहे. मयताची व जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत
जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने शासकिय वैद्यकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले