Accident : पाल घाटाजवळ रिक्षा नाल्यात उलटली, १ ठार, १ जखमी

ऑगस्ट 9, 2022 8:29 PM

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथून सुमारे १२ कीमी दूर असलेल्या खिरोदा – पाल रस्त्यावर पाल कडून खिरोदा मार्गे फैजपूर येथे जाणारी अँपे रिक्षा क्रमांक MH-19-CW-0980 ही मंगळवारी सायंकाळी खिरोदा घाटाजवळ भिलट बाबा मंदिराचे पुढे नाल्यात उलटली यावेळी एक जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे.

सावदा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले. जखमीला तातडीने भुसावळ येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. यात कपले नामक फैजपूर येथील व्यक्ती ठार झाली असून मंडवाले नामक व्यक्ती जखमी झाली आहे. जे. सी. बी च्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. यावेळी पो.हे.कॉ जयराम खोडपे, पो,हे,कॉ युसूफ तडवी, मेहरबान तडवी, संजय तडवी, देवा पाटील यांनी तातडीने मदत केली. या प्रकरणी सावदा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे

accident 18 jpg webp

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now