---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

ACB Trap : २०० रुपयांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । जळगाव लाचलुचपत विभागाचे काम सध्या दमदार सुरू असून दर आठवड्याला एक कारवाई होत आहे. पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाने दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली.

acb trap 1 jpg webp webp

दोन दिवसांपूर्वी ३०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठीवर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. आज पुन्हा एक कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी पाच वाजेच्यास सुमारास जळगावातील न्यू बी.जे. मार्केटमधील कौटूंंबिक न्यायालयाच्या वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. हेमंत दत्तात्रय बडगुजर (जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

---Advertisement---

कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---