लग्नाचे आमिष देऊन शिक्षिकेवर वेळच्यावेळी अत्याचार ; जळगावातील प्रकार

सप्टेंबर 15, 2024 2:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२४ । जळगावातून अत्याचाराची आणखी एक घटना समोर आलीय. धक्कादायक एका शिक्षकाने लग्नाचे आमिष देऊन शिक्षिकेवर वेळच्यावेळी अत्याचार केला. शिक्षकाने लग्नास नकार दिल्याने शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्षकाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.

Untitled design 15 jpg webp

एका शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेसोबत प्रशांत झाल्टे याने सहानुभुती दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच तू मला आवडते असे सांगून तीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. शिक्षिकेने त्याला

लग्नाविषयी विचारले असता तो नकार देऊ लागला. त्यानंतर सदर शिक्षिका त्याच्या घरी गेली असता त्याने नकार कायम ठेवला. त्या वेळी त्याच्या आईने शिक्षिकेला सांगितले की, त्याचे लग्न झालेले आहे, तुला या घरात यायचे असल्यास त्याच्या लहान भावाशी लग्न करावे लागेल असे सांगितले, मात्र त्या महिलेने नकार दिला.

अखेर या प्रकरणी शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्षक याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या आईविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now