रागात घर सोडून गेलेल्या 16 वर्षीय मुलीसोबत घडलं भयंकर ; वाचून तुम्हीही हादरून जाल..

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२३ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना कमी होत नसून ते दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच जळगाव शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. असं की ते पीडित मुलगी कधीच विसरू शकणार नाही. आईसोबत झालेल्या भांडणानंतर घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर महिनाभरात वेळोवळी एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील एका भागात ही १६ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगीचे ७ जानेवारीला आईसोबत भांडण झाले. या रागातून आईला काही एक न सांगता अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. मात्र यानंतर ती चुकीच्या ठिकाणी पोहचली आणि तिच्या सोबत भयंकर घडलं. यादरम्यान तिला शहरात नितू उर्फ जोया राजू बागडे या नावाची महिला भेटली. जोया हिने ओळख करत अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेले. तिथे मुलगी पाच ते सहा दिवस राहिली.

त्यांनतर जोया हीने अल्पवयीन मुलीला चाळीसगावात नेऊन ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे (रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांच्याकडे ठेवले. काही दिवस तिच्याकडून काम करून घ्या. तुमच्या घरी राहू द्या, असे जोया हिने ज्योती आणि चंद्रकांत या दाम्पत्याला सांगितले. याठिकाणी अल्पवयीन मुलीने मी काही चुकीचे काम करणार नाही. मला घरी जायचे आहे, असे सांगितले. पण जोया आणि ज्योती या दोघींनी मुलीला नकार दिला. तुला रोज रात्री गिऱ्हाईकांडून भरपूर पैसे मिळतील. फक्त दोन तीन गिऱ्हाईक काढ, अशी दमदाटी केली आणि याठिकाणाहून जोया निघून गेली.

यादरम्यान वेळावेळी पीडित मुलीने जळगावला जायचे, असे सांगितले. मात्र ज्योती आणि चंद्रकांत या दोघांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला मारून टाकू, जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच या धमकीतून मुलीला त्यांचे घरी तसेच इतर हॉटेलवर घेवून जात तिला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. यापोटी ज्योती व चंद्रकांत यांनी गिऱ्हाईकांकडून प्रत्येकी ३ ते चार हजार रुपये घेतले. अशा प्रकारे ज्योती व चंद्रकांत यांनी महिनाभर मुलीला धमकी देत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले.

जळगावला जायचे सांगत, दाम्पत्याने सोडा पाजून तिला रेल्वेत बसून दिले. सोडा प्यायल्यावर मुलीला उमजले नाही. जेव्हा ती उठली तेव्हा ती ठाण्यात पोहचली होती. याठिकाणी तिला पोलिसांनी कल्याण येथील महिला व बाल कल्याण मंडळ येथे दाखल केले. मात्र याठिकाणी मुलीने भितीने तिच्यासोबत घडलेला प्रकार न सांगता आईसोबत भांडण झाल्याचे सांगीतले. त्यावेळी पोलिसांनी मुलीच्या आईला संपर्क साधत मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

चाळीसगाव येथील दाम्पत्य १० फेब्रुवारीला मुलीला घेण्यासाठी जळगावात आले. तुझे कपडे राहिले असून ते कपडे घेण्यासाठी परत चल, असं म्हणत पुन्हा चाळीसगावात नेलं. या ठिकाणी पुन्हा ज्योतीबाईने अल्पवयीन मुलीला सोडा पाजून तिच्याकडे रोज गिऱ्हाईक पाठवत शरीर संबंध ठेवण्याचे काम करून घेतले. याच दरम्यान २३ फेब्रुवारीला पोलीस येणार असल्याचे सांगत ज्योती व तिच्या पतीने मुलीला जळगावला जा असे सांगितले. त्यानुसार मुलगी ही जळगावात घरी आली. आणि महिन्याभरात घडलेली सर्व हकीकत तिच्या आईला सांगितली.

यानंतर आईसोबत पीडित मुलगीने एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले व या ठिकाणी घडल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. या तक्रारीनुसार नितू उर्फ जोया राजू बागडे, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार या तीन जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहेत.