---Advertisement---
गुन्हे भुसावळ

अल्पवयीन मुलीवर बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार; भुसावळ शहरातील खळबळजनक घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज। २४ जुलै २०२३। भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 5 jpg webp webp

भुसावळ शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासाला आहे. २१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अजय गिरधारी गोडाले याने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसचे सगळ्यांना बंदूकीने मारून टाकेल अशी धमकीही दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलगी आपल्या परिवारासह भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

---Advertisement---

त्यानुसार रविवारी २३ जुलै रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी अजय गिरधारी गोडाले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---