जळगाव जिल्ह्यात रासायनिक व सेंद्रिय खतांचा भरपूर साठा उपलब्ध

जून 30, 2025 8:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । खरीप हंगाम २०२५–२६ करिता जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध प्रकारच्या रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने केले आहे.

fertilizer

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये DAP, MOP, युरिया, SSP, NPKS व FOM अशा प्रमुख खतप्रकारांचा साठा उपलब्ध असून, त्यामध्ये जामनेर तालुक्यात सर्वाधिक १४,२९९ मेट्रिक टन खतसाठा असून तो जिल्ह्यातील सर्वाधिक आहे. त्यानंतर रावेर तालुक्यात ८,८६७ मेट्रिक टन साठा असून भडगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे १,९७५ मेट्रिक टन साठा आहे.

प्रमुख खतप्रकारांचा एकूण साठा खालीलप्रमाणे आहे:
DAP: १३१७.५ मेट्रिक टन
MOP: ७३५५.४९ मेट्रिक टन
Urea: १८,९८८.१७ मेट्रिक टन
SSP: ३५,२८९.२५ मेट्रिक टन
NPKS: ३४,४४५.७२ मेट्रिक टन
FOM (सेंद्रिय खत): ८७.२९ मेट्रिक टन

खतांचा साठा सुरक्षित असून शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता योग्यवेळी व गरजेनुसार खतांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. खतसाठ्याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभाग सतर्क असून शेतकऱ्यांच्या शेतीसमृद्धीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now