मुस्लिम कब्रस्तान व इदगाह ट्रस्टच्या अध्यक्षपदी अब्दुल वहाब मलिक
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ । जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठी अल्पसंख्यांक समाजाची विश्वस्त संस्था मानली जाणारी मुस्लिम कब्रस्तान व इडगाह ट्रस्ट असून तिच्या स्वतःच्या मालकीचे सुमारे 140 दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्व मालकीचे ईदगाह मैदान व स्व मालकीचे कब्रस्तान आहे या संस्थेच्या अध्यक्षपदी 2 सप्टेंबर 18 रोजी हाजी गफ्फार मलिक यांची निवड करण्यात आली होती. त्यांचे 24 मे रोजी निधन झाल्याने 31 मे 2021 रोजी कब्रस्तान – इदगह कार्यकारणी मंडळाची सभा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद मुश्ताकअली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व त्यात कार्यकारिणीच्या पुढील कालावधीसाठी अब्दुल बहाब रज्जाक मलिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सर्वप्रथम ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी घटनेतील नियम व नियमावली चे नियम व कायदा याचे नियम समोर सादर केले त्यानंतर उपाध्यक्ष रियाज मिर्झा यांनी नवीन रिक्त झालेल्या विश्वस्त पदासाठी वहाब मालिक यांचे नाव सुचित केले त्यास विश्वस्त इकबाल बागवान यांनी अनुमोदन दिले त्यानंतरच्या ठरवास अध्यक्ष निवडीसाठी ट्रस्टचे खजिनदार अश्फाक बागवान यांनी वहाब मलिक यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचित केले त्याला नजीर मुलतानी यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला।
सभेत 14 पैकी 13 विश्वस्त हजर होते तर एक वरिष्ठ विश्वस्थ गुलाब फते मोहम्मद यांनी ऑनलाइन द्वारे सभेत सहभाग नोंदवून या ठरावाला संमती दर्शवली.
सभेत मुस्ताक अली, रियाज मिर्झा, फारुक शेख, अश्फाक बागवान, मुकीम शेख, अनिस शाह, ताहेर शेख, मजहर खान, सादिक सय्यद, एडवोकेट सलीम शेख, याकूब खाटीक, इक्बाल बागवान ,सय्यद सादिक यांची उपस्थिती होती.
विशेष आमंत्रित म्हणून जळगाव शहर चे काजी मुफ्ती अतिक उर रहेमान, जमियात उलमा चे मुफ्ती हारून नदवी, उलेमा कौन्सिलचे जामा मस्जिद चे मौलाना उस्मान काशमी, माजी अध्यक्ष करीम सालार ,कुल जमातीचे सय्यद चांद व ट्रस्टचे विधी सल्लागार एडवोकेट अकील इस्माईल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अध्यक्षपदी निवड झाल्यावर व वहाब मलिक यांना आमंत्रित करण्यात आले व त्यांना सेक्रेटरी फारुक शेख यांनी निवड पत्र सोपविले उपस्थित सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
विशेष आमंत्रित मुफ्ती अतिक,मुफ्ती हारून, सय्यद चांद, मौलाना उस्मान कासमी, एडवोकेट अकील इस्माईल यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले व मौलाना उस्मान कासमी यांनी प्रार्थना करून सभेचे समारोप करण्यात आले.