जळगाव जिल्हा
जळगाव शहर मतदारसंघामधून ‘या’ उमेदवारांने घेतली माघार
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केलेल्या उमेदवारांना आज दुपारी ३ वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर यानंतर प्रत्येक मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते अब्दुल अजीज सालार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. वरिष्ठांच्या आग्रहास्तव आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात येत्या २० नोव्होंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे. आज ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.