गुन्हेजळगाव जिल्हा

अबब.. दोन ठिकाणी घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । अज्ञात भामट्यांनी घरफोडी करून एका ठिकाणी तब्बल २७ हजरांचा मुद्देमाल लंपास केलाय. तर दुसऱ्या ठिकाणी घरचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत सुमारे ३६,६३४ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेने त्या त्या परिसरात खळबळ उडाली असून चोरट्यांचे सूत्रच असल्याने नागरिक त्रस्त झालेय. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

चाळीसगाव शहरातील सानेगुरुजी रोड नगर समर्थ पार्क अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ ते ४.३० वाजे दरम्यान घडलीय. विलास रघुनाथ चव्हाण (वय २४) यांनी चाळीसगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी भेट दिली. झालेल्या घरफोडीत अज्ञात भामट्याने तब्बल २७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. भा, कलम ३८०, ४५४ प्रमाणे अज्ञात भामट्या गुन्हा दाखल झाला आहे. तपास अभिमन पाटील करत आहे.

हरी पुंडलीकर माळी (वय ५५) यांनी पोलिसांत तक्रार दिली. दि.१९ रोजी माळी यांचा घरचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात भामट्याने अनाधिकृतपणेघरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातून ३६,६४५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनास्थळी जामनेर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी भेट दिली. त्यानुसार अज्ञात भामतांविरुद्द भा. कलम ३८० प्रमाणे पहूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास गणी तडवी करत आहे.

Related Articles

Back to top button