बामणोदच्या युवकाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन संपविली जीवनयात्रा

सप्टेंबर 4, 2023 5:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३ । यावल तालुक्यातील बामणोद येथील एका १९ वर्षीय युवकाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. देवेंद्र पंकज पाटील (वय १९, रा. इंदिरानगर, बामणोद ता. यावल) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 1 jpg webp

बामणोद येथे देवेंद्र पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याने रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यात तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो गंभीर जखमी झाला. यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे.

या संदर्भात मयताचा भाऊ भूषण पंकज पाटील यांनी फैजपुर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे करीत आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now