जळगावात गावठी पिस्तूल घेवून फिरणाऱ्या तरूणास अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । मेहरूण परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. योगेश अंबादास बारी (वय-३१) असे संशयित ओपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातील पिस्तूल व काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, शहरातील मेहरूण परिसरात एक तरूण बेकायदेशीर गावठी बनावटीचा पिस्तूल आणि काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलीसांनी शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी योगेश अंबादास बारी (वय-३१) रा. बारीवाडा पिंप्राळा याला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूला आणि दोन जिवंत काडतूस आढळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी रात्री उशीरा पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश बारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.