---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगावात ट्रॅफिक वॉर्डन तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक उल्लेख..

---Advertisement---


जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ | माझ्या आत्महत्येला ४ लोक जबाबदार आहेत. मला वारंवार मानसिक त्रास देऊन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत असतात. किशोर तिरमल, गजानन तिरमल, श्यामसुंदर तिरमल आणि त्यांची आई रुख्माबाई तिरमल यांच्या पासून आमच्या परिवाराला देखील धोका असून म्हणून मी हा निर्णय घेत आहे.

atamtya jpg webp webp

अशी सुसाईड नोट लिहून मेहरूण येथील रामेश्वर कॉलनीतील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. २६ एप्रिल रोजी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

---Advertisement---

उमेश एकनाथ ठाकूर (वय-३७) रा. श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे. उमेश ठाकूर हा आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह राहतात.

बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार त्यांचा मुलगा ओम याच्या लक्षात आल्याने समोर आला. मृतदेह पाहून पत्नी व आईने एकच हंबरडा फोडला होता. उमेश वाहतूक पोलिसांकडे ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली.

शेजारी राहणाऱ्या तरूणानी धाव घेवून मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---