जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । रावेर तालुक्यातील निंबोल शेत शिवारात एका तरुणाची डोक्यामध्ये दगड टाकून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शेख अफजल शेख असलम उर्फ कालू (वय २७, रा. ऐनपुर, ता. रावेर) असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे हे सध्या सामोर आले नाही. याबाबत निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
ऐनपूर (ता. रावेर) येथील मयत शेख अफजल शेख असलम हा १४ नोव्हेम्बरला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतात जात असल्याचे सांगून घरून निघाला. शेतात जात असताना त्याने मित्राची दुचाकी नेली होती. परंतु तो घरी परतला नसल्याने वडीलांनी त्याला फोन केला. मात्र कोणताच प्रदिसाद मिळत नसल्याने वडीलांनी छोट्या भावाकडे फोन करून विचारणा केली.
लहान भाऊ शेख फारुक हा त्याच्या शोधात शेताकडे गेला असता अफजलचा मृतदेह आढळून आला. मात्र दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास त्याची ऐनपूर- निंबोल दरम्यान निंबोल शिवारात गायरान जमिनीच्या रस्त्यांवर त्याचा मृतदेह आढळून आला. ज्या रस्त्यांवर मृतदेह आढळला त्या रस्त्यांवरच त्याचे शेतही आहे. त्याचा खुन झाला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटूंब हे द्वारदर्शनावर मलकापुर येथे गेले होते. मृतदेहाजवळ एका भलामोठा दगड आढळून आला आहे. त्याच्या हत्येमागे नेमका कोण व किती जण आहे हे सध्या सामोर आले नाही. या खुनाच्या घटनेमुळे परीसर हादरला आहे. स्वान पथक दाखल होत पंचनामा करत पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.