यावलच्या तरुणाने पुलावर दुचाकी लावून घेतली तापी नदीत उडी

सप्टेंबर 26, 2024 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२४ । भुसावळ शहरालगत असलेल्या तापी नदीच्या पुलावर दुचाकी उभी करून तरुणाने पुलावरून थेट नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. लखन संजय कोळी (वय २८) असे या तरुणाचे नाव असून नदीपात्रात त्याचा शोध घेतला जात आहे.

tapi river jpg webp

यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील लखन संजय कोळी हा आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह राहत होता. लखन कोळी हा मंगळवारी दुपारी साडेतीनला मोटरसायकल घेऊन भुसावळला गेला. यानंतर त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावली व तेथून नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सदर तरुण यावल शहरातील बोरावल गेट भागातील असल्याचे समजतात शहरातील अनेक नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध नदीत सुरू होता. मात्र तो आढळून आला नाही. आज सकाळी पुन्हा नदीपात्रात त्याचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now