रविवारची सुटी जीवावर बेतली; निंबादेवी धरणावर जळगावचा तरुण बुडाला

जून 30, 2025 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रविवारची सुट्टी असल्याने धरणावर जाऊन पोहोण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. यावल तालुक्यातील सावखेडासिम जवळील निंबादेवी धरणात जळगावातील १८ वर्षीय तरुण बुडाला. जतीन अतुल वार्डे (वय १८, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असं धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसऱ्या एका तरुणाचा मात्र थोडक्यात जीव वाचवण्यात आला.

jatin varde

याबाबत असे की, जळगाव येथील रामेश्वर कॉलनी भागातील आठ तरुण निंबादेवी धरणावर गेले होते. दरम्यान त्यातील जतीन वार्डे हा अंघोळीसाठी खोल पाण्यात गेला आणि बुडला. जतीनसह अजुन एक तरूण हा खोल पाण्यात बुडत होता. तेव्हा धरणात अंघोळ करणाऱ्या तरुणांनी समय सूचकता दाखवत मानवी साकळी तयार करून त्याचे केस ओढून खोल पाण्यातून त्याला बाहेर काढून वाचवले.

घटनेची माहिती पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी यावल पोलिसांना दिल्यानंतर सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली असून, सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

धरण परिसरात जाण्यास मनाई – पोलिसांचा इशारा
सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरण परिसरात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते. तसेच त्या भागातील रस्त्यांची अवस्था वाईट असून अपघाताचा धोका अधिक आहे. नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now