---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव जळगाव जिल्हा

चाळीसगावातील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

---Advertisement---

accident 34 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । चाळीसगाव शहरातील तरुणाचा दुचाकी अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्षल चंद्रभान चौधरी असे मयत तरुणाचे नाव आहे.

---Advertisement---

हर्षल हा चुलत भाऊ सागर रवींद्र चौधरी (30, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याचे धुळे रोडवरील हॉटेल साई पॅलेसचे सुरू असलेला काम पाहण्यासाठी सोमवा, 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गेला असता परतत असताना सागर व हर्षल दोन्ही स्वतंत्र दुचाकीने घरी येत असताना चाळीसगाव-धुळे रोडवरील पुन्शी पेट्रोल पंपासमोर महादेव मंदिराकडून येणार्‍या भरधाव दुचाकी (एम.एच. 19 बी.ए2613) ने हर्षलच्या होंडा कंपनीची शाईन दुचाकीला (क्र. एम.एच. 19 बीए 1877) रात्री 9 वाजताच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात हर्षलला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे डॉक्टरांच्या सल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र बुधवारी त्याची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी सागर रवींद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात चालक रुपसिंग बाबू जाधव (कृष्णापुरी तांडा लोंढे, ता.चाळीसगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---