जळगावात प्रेमभंगाच्या नैराश्यातून विद्यार्थ्याने उचललं धक्कादायक पाऊल

एप्रिल 27, 2025 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२५ । जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालया परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय, ज्यात प्रेमभंगाच्या नैराश्यातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली असून सत्तू कोळी असून, त्याचे पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

crime 2 jpg webp

आत्महत्या करण्यापूर्वी सत्तूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटस ठेवत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सकाळी काही विद्यार्थ्यांच्या लक्षात ही घटना येताच महाविद्यालय प्रशासन व पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मयताची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी जिल्हा पेठ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment