महिला पोलीस छळाची बळी, पतीविरोधात गुन्हा दाखल

ऑक्टोबर 11, 2022 1:04 PM

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । विवाहितेला पैशांसाठी छळ केला जात असल्याचे आपण वाचले असेल, पण एका 37 वर्षीय महिला पोलिसाचा मूलबाळ होत नसल्याने छळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात महिलेले दिलेल्या फिर्यादीनुसार पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 12T155737.257 jpg webp

यावल तालुक्यातील शिरसाड येथील हलिमा रोशन तडवी (वय 37) या मुंबई पोलिस दलात सेवारत असून मुंबईत कार्यरत आहे. त्यांचा विवाह 2019 मध्ये रोशन जहांगीर तडवी (फालक नगर, भुसावळ) यांच्याशी झाल्यानंतर लग्नाच्या दोन वर्षानंतर रोशन तडवी यांनी विवाहितेला मूलबाळ होत नाही तसेच जुनी चार चाकी घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये न आणल्याने छळ करण्यास सुरूवात केली. शारीरीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्यानंतर विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now