विचवा गावाजवळ भरधाव ट्रकची चारचाकीला धडक

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । भरधाव ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोदवड शहरातील डॉक्टर जखमी झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रक चालकाविरोधात गुन्हा
डॉ.उदय सुधाकर पाटील (45, बोदवड) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 8 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ते बे्रझा (एम.एच.19 सी.टी.5100) ने बोदवड ते जळगाव निघाले असताना समोरून येणार्‍या अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला समोरून धडक दिल्याने वाहनाचे नुकसान झाले तसेच डॉक्टरांच्या उजव्या हाताला व पोटाला दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. या प्रकरणी बोदवड पोलिसात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विलास महाजन करीत आहेत.