गुन्हेजळगाव शहर

शेतकऱ्याची दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । शेतकऱ्याची दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईश्वर जगन्नाथ सपकाळे (२९ वय, रा. धामणगांव ता.जि. जळगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव शहरातील मो.सा चोरी करणारे आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, सहा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मागदर्शन व सुचना नुसार पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळवीली की, जळगाव तालुका पोस्टे कडील सीसीटीनएस गुरनं २८८ / २०२२ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे सदरचा दाखल गुन्हयात चोरीस गेलेली मो.सा ही रेकॉर्डवरील गुन्हेगार ईश्वर जगन्नाथ सपकाळे रा. धामणगांव ता.जि. जळगावहा वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि जालींदर पळे, पोहेकॉ जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना / १४१८ नितीन बाविस्कर, पोना / ३२४२ अविनाश देवरे, पोना/ अशांना आरोपीताचा शोध घेण्याचा आदेश दिला.

दरम्यान, संशयीत आरोपीतास खोटेनगर बसस्टॉप वरून चोरी केलेल्या मो.सा सह ताब्यात घेवुन त्यास विचारपुस करता त्याने वरनमुद गुन्हा त्याचे साथीदाराचे मदतीने केला असल्याचे कबुल केल्याने आरोपी नामे ईश्वर जगन्नाथ सपकाळे वय २९ रा. धामणगांव ता. जि. जळगाव यांस वरील गुन्हयात चोरी केलेली मो.सा १ स्टार सिटी कंपनीची लाल रंगाची मो.सा सह वरनमुद गुन्हयाकामी ताब्यात घेवुन पुढील कारवाई करीता जळगांव तालुका पोस्टे यांचे ताब्यात दिले आहे. सदर चा आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असुन त्याचे विरूध्द यापुर्वी सुध्दा मो.सा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

Back to top button