⁠ 
रविवार, मे 19, 2024

अखेर जंगलव्याप्त परीसरातील शेतकऱ्यांना मिळणार ‘झटका’ मशीन !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्युज|सुभाष धाडे| जंगलव्याप्त परीसरालगत असलेल्या शेतीशिवारात वन्यप्राण्यांकडुन शेतीपिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान दरवर्षी होत असते.परिणामी वनविभागालाही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी लागतेच.

वन्यप्राण्यांकडुन होणारे नुकसान खुप मोठे असते मात्र शासनाकडुन मिळणारी भरपाई तोडक्या स्वरूपात असल्याने, वन्यप्राण्यांकडुन वारंवार होणाऱ्या नुकसानीला त्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांकडुन (सोलर कुंपन) झटका मशीन ची मागणी सातत्याने होत होती. याप्रकाराला आळा घालण्यासाठी वनमत्रांलयाने महत्वपुर्ण निर्णय घेतला असुन 50 कोटी रुपयांच्या निधीची देखिल तरतुद केली आहे.


सोलर कुंपणमुळे वन्यप्राण्यांना इजा होणार नाही मात्र झटका बसणार यामुळे वन्यप्राणीही आणि शेतीपिकेही सुरक्षित राहणार आहेत. दरम्यान डाँ.श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजनेची व्याप्ती वाढवत 25 मे 2022 सोलर कुंपन योजना राज्यभरात राबविण्याचा आदेश निघाला.

राज्यातील 1173 गावांमध्ये 33 हजार लाभार्थांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. जंगलालगतच्या अतिसंवेदनशील भागातील शेतसरंक्षणार्थ 90 टक्के अनुदानावर हि योजना राबवली जाणार असुन 50 कोटी रुपयाच्या निधीची तरतुद वनमत्रांलयाने केली आहे.


सुरुवातीला कंत्राटदार साहित्य पुरविणार होते. टेंडर काढण्यात आली.कंत्राटदारांकडुन काही ठिकाणी 75 टक्के अनुदानावर वाटप सुद्धा केले. मात्र अनुदानाची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात हस्तांतरीत करण्याच्या सुचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या असल्याने हि योजना तात्पुर्ती थांबली होती.

आता नवीन निकषाप्रमाणे, निवड झालेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी सोलर कुंपन साहीत्य (झटका मशीन) खरेदी करायची आहे नंतर 90 टक्के अनुदान थेट हे लाभार्थींच्या खात्यात डिबीटी पद्धतीने जमा होणार आहे.
दरम्यान यामुळे वन्यप्राण्यांकडुन होणारी कोट्यावधींची शेतपीक नुकसानीला आळा बसणार आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.