जळगाव जिल्हा कारागृहामध्ये एका बंदीला दोघांकडून बेदम मारहाण

सप्टेंबर 29, 2025 1:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा कारागृहामधून धक्कादायक बातमी समोर आलीय. जिल्हा कारागृहात सोहम गोपाल ठाकरे (वय २०) या बंदिवानाला झोपेतून उठवून दोन बंद्यांनी बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं. या प्रकरणी कुणाल गोपाल चौधरी व अजय मोरे या दोन बंद्यांविरुद्ध जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaon district jail

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील सोहम ठाकरे याला २० सप्टेंबर रोजी जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक १३मध्ये तीन क्रमांकाच्या सर्कलमध्ये ठेवण्यात आले. २७ सप्टेंबर रोजी सकाळी तो झोपलेला असताना तेथे कुणाल चौधरी हा आला व पायाने धक्का देत उठवले व बाहेर ये, मला तुझ्याशी काम असल्याचे सांगू लागला. सोहम उठताच त्याला मारहाण सुरू केली.

तसेच अजय मोरे याने पकडून ठेवले व कुणालने बॅरेकवर डोके आपटून सोहमला दुखापत केली. त्याच्या कपाळ, नाकातून रक्त आले. इतरांनी त्याची सुटका केली. सोहमने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कुणाल चौधरी व अजय मोरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कारागृहाच्या आतमध्येच झालेल्या या घटनेमुळे तेथील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now