देवझिरी वनक्षेत्रात झाडाची चोरी करणाऱ्यास वन कोठडी

मार्च 11, 2024 3:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा राहणार मेलाणे हा अवैधरित्या साग वृक्ष २७ व इतर प्रजातीचे वृक्ष ३१ असे एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना सदर इसमा विरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.

devgiri jpg webp

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मधील राखीव वनात राजेंद्र डोका-या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली असता सदर इसमाने महिला वनरक्षक यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांचा विनयभंग करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून पसार झाला होता. सदर घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला वनरक्षक राजेंद्र डोका-या पावरा विरुध्द गुन्हा दाखल केला. सदर आरोपीस न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चोपडा यांनी सदर आरोपी यांस ११ मार्च 2024 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. व इतर वनगुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाची टीम तयार करण्यांत आली असुन वनगुन्हयातील काही आरोपी हे फरार आहेत. फरार आरोपीची शोध मोहिम चालु आहे.

पुढील तपास जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल. आर. बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी (प्रा.) व किरण श. गजरे, वनपाल बोरमळी हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now