जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची आज सावदा येथे विविध ठिकाणी भेटी दिल्या यावेळी येथील नगरपालिका उर्दू शाळा येथे भेट दिली या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो इमारतीतील नऊ खोल्यांमध्ये प्रचंड पाणी गळते फिरोजखान पठाण व पालक वर्गाने तक्रारी केल्या असता आमदार चंद्रकांत पाटील यांनी आठ दिवसातच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल आमदार निधीतूनच हे काम त्वरित मार्गा लागेल असे आश्वासन देण्यात आले.

सावदा शहरातील घनश्याम राजेंद्र पाटील व पंकज चव्हाण या दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक फिरोज खान पठाण सुरज परदेसी सागर आरीफ आझाद मुक्ताईनगर मुक्तार भाई मनीष भंगाळे गणेश माळी नितीन सपकाळे सागर दुर्गादास चौधरी अक्षय नेमाडे फिरोज भाई मेहताब भाई चॉद मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









