---Advertisement---
एरंडोल

एरंडोल शहरासाठी २९ कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस मिळाली मंजुरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । केंद्रसरकारच्या माध्यमातुन एरंडोल नगरपालिकेस अमृत-२ योजनेंतर्गत २९कोटींच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. अमृत-२ मधुन एरंडोल न.पा.च्या पाणीपुरवठ्याला मंजुरी मिळाल्यामुळे १९७२ नंतर एरंडोल वासियांना HDP च्या नविन पाईपलाईन द्वारे पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था होणार असून एरंडोल शहरासाठी मोठी उपलब्धि होणार आहे अशी माहीती खा. उन्मेश पाटील यांनी एरंडोल नगरपरीषदेत घेतलेल्या आढावा बैठकी प्रसंगी दिली.

water supply jpg webp

सुरूवातीला मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी खा.उन्मेश पाटील यांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, राज्य जनजातीय आघाडीचे अँड.किशोर काळकर यांची उपस्थिती होती.

---Advertisement---

खा.उन्मेश पाटील यांनी नगरपालिकेच्या कामकाजाचा विभागनिहाय आढावा घेतला. माजी नगराध्यक्षांनी केंद्रसरकार पुरस्कृत १२०० पथदिवे एल ई डी प्रकल्प उर्जाबचत करणारा महत्वाचा प्रकल्प शहराला प्रकाशमय करणारा असल्याने एरंडोल नगरवासीयांच्या वतीने परदेशी यांनी खासदारांचे आभार व्यक्त केले.

मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सुरू असलेल्या व प्रलंबित योजनांसाठी खा. उन्मेश पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन मिळते असे प्रतीपादन केले.

शहराला प्रतीमाणसी १ वृक्षलागवड करून हरीत एरंडोल चा संकल्प आणी नियोजन करून मनरेगातुन ‘क, वर्ग नगरपालिकेला योजना राबविण्यासाठी दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकार्यांना खा. उन्मेश पाटील यांनी सुचना दिल्या तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या अडीअडचणी समजुन घेत नविन एजन्सीद्वारे प्रस्ताव आणी सर्वेक्षण तयार करून शहरातील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यासंदर्भातल्या अडीअडचणी दूर व्हाव्यात यासाठी खा.पाटील यांच्या कडून संबंधित अधिकार्यांना सुचना देण्यात आल्या.

खा.पाटील यांनी विविध योजनांच्या कामाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी सचिन विसपुते,निलेश परदेशी,पिन्टू राजपूत, जगदीश पाटील,अमरजितसिंग पाटील,राजेंद्रसिंग पाटील,कल्पेश पाटील,राजेन्द्र शिंदे, जगदीश ठाकूर, चिंतामण पाटील, कार्यालय अधीक्षक विनोदकुमार पाटील, डॉ.अजीत भट,विकास पंचबुध्दे,विक्रम घुगे,भूषण महाजन,हितेश जोगी, आनंद दाभाडे, दिपक गोसावी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---