जळगावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा 42 वर्षीय प्रौढाकडून विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे महिलांसह मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच जळगावातून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंगाची घटना समोर आलीय. जळगाव शहरातील जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातून पायी जात असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा 42 वर्षीय प्रौढाने विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील एका भागात 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी वास्तवास आहे. मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थी ही जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातून जात होती. यादरम्यान 42 वर्षीय प्रौढाने अल्पवयीन विद्यार्थीच्या समोर येऊन तिच्यासोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

गुन्हा दाखल
याप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंग करणाऱ्या राजेंद्र विश्वनाथ भगत वय 42 याच्या विरोधात रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.