जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचे प्रकार सुरूच आहे. काल मंगळवारी रोजी पुन्हा जळगावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात ही १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादी नुसार अल्पवयीन मुलगी ही सोमवारी रोजी जळगाव शहरातील महिला महाविद्यालयात आली असता तिला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. दरम्यान, नातेवाईकांनी मंगळवारी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. तिला दि.२९ रोजी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास कुणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. पीडित मुलीच्या वडिलांनी रामानंदनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.








