---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगाव शहरातून विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता, पोलिसात नोंद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । शहरातील कांचन नगर परिसरात राहणारी २८ वर्षीय विवाहित घरात कोणाला काहीही न सांगता गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

missing women jpg webp

कांचननगर परिसरातील कालिंका माता मंदिराजवळ राहणारे दीपक पाटील हे खासगी कंपनीत मजुरीला असून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नी हर्षाली पाटील (वय-२७) या गुरुवार दि.१७ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहेत. त्यांचा इतरत्र शोध घेऊनही त्या घरी न परतल्याने त्यांचे पती दीपक खुशाल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

---Advertisement---

दीपक पाटील यांच्या खबरीवरून शुक्रवार दि.१८ मार्च रोजी सायंकाळी शनिपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---