जळगावातील सौरभ ज्वेलर्सवरील दरोड्याबाबत मोठी अपडेट समोर

मे 26, 2024 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । जळगाव शहरातील सौरभ ज्वेलर्समध्ये दरोडा टाकत सुमारे 32 लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. याप्रकरणी आतापर्यंत सहा संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे. सदरचा दरोडा हा हद्दपार आरोपी सोनू सारवान याने रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. मात्र या दरोड्याप्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलीय.

crime 2 jpg webp

सौरभ ज्वेलर्समध्ये तीन वर्षांपूर्वी कामावर असलेल्या माणसाने आतील सर्व इत्यंभूत माहिती पुरविल्याचेही तपासातून समोर आले असून, रितेश संतोष आसेरी असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीवरूनच सदरचा दरोड टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयित दरोडेखोरांकडून सुमारे 1 लाख 20 हजार रूपयांची चांदी ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच दरोड्याच्या गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी देखील जप्त केल्या आहेत. सोन्याचा तपास अद्याप लागलेला नाही. अटकेतील आरोपींचा अन्य चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातही संबंध असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाली आहे. त्यात धुळ्यातील सुमारे सव्वा कोटी रूपयांच्या दरोड्याचा देखील समावेश आहे. दरोड्यातील प्रमुख संशयित आरोपी सोनू सारवान याच्या नावावर यापूर्वी तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. सध्या तो हद्दपार असुनही जळगाव शहरात बिनधास्तपणे फिरत होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now