फरिदाबादमध्ये दहशतवाद्यांच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश ; डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, रायफल्ससह दारूगोळा जप्त

नोव्हेंबर 10, 2025 12:33 PM

नवी दिल्ली । जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबादमध्ये दहशतवाद्यांच्या एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. अटक केलेल्या एका डॉक्टरच्या माहितीनुसार फरिदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरावर टाकलेल्या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आली. एका डॉक्टरच्या माहितीवरून ३०० किलो आरडीएक्स, दोन एके-४७ रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे या कारवाईने देशभरात खळबळ उडाली आहे.

300kg

डॉ. आदिल अहमद राथर असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव असून, तो अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये औषध विशेषज्ञ होता. डॉ. राथर यांने बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे प्रचाराचे पोस्टर लावल्याप्रकरणी सहारनपूर येथून श्रीनगर पोलिसांनी अटक केली होती.

सध्या डॉ. आदिल जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. आदिल राथरची चौकशी केली असता अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघड झाल्या आहेत. दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन डॉक्टर होते. त्यातील दोघांना अटक करण्यात आली, मात्र तिसरा डॉक्टर अजूनही फरार आहे. तपासादरम्यान, डॉ. राथरने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी हरियाणातील फरीदाबाद येथे छापा टाकला. या छाप्यात ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. डॉ. राथर हा अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहिवासी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now