⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

प्लॅट भाड्याने घेण्याचे सांगत जळगावातील एकाला गंडविले

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या ग्रीन हाईट्स बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या फ्लॅट भाड्याने देण्यासाठी ऑनलाइन ऍड दिली होती. दरम्यान, जाहिरात पाहून एकाने संपर्क केला आणि मी आर्मीत असल्याचे सांगत २४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे.

शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या ग्रीन हाईट बिल्डिंगमध्ये राहणारे संजय राधाकृष्ण भाटिया यांचा मोदीपुरम, मेरठ उत्तरप्रदेश येथे ३ रूमचा फ्लॅट आहे. फ्लॅट भाड्याने देण्यासाठी दि.२२ रोजी त्यांनी ९९एकर या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. दि.२३ जुलै रोजी सकाळी त्यांना रणजित सिंग नावाच्या व्यक्तीने फोनवरून संपर्क करून मी आर्मीमध्ये काम मला रूमची आवश्यकता असून रूम भाड्याने मागितला.

प्रतिमहा १२ हजार रुपये प्रमाणे भाडे निश्चित होऊन एक महिन्याचे भाडे अनामत असे २४ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. समोरील व्यक्तीने भाटिया यांच्याकडून बँकेचा अकाउंट नंबर मागितला नंबर दिल्यानंतर माझे आर्मीचे अकाउंट असल्याने मला डायरेक्ट पैसे टाकता येत नाही त्यामुळे त्याने त्याच्या ओळखीच्या अनुकल्प अनिल या व्यक्तीच्या अकाउंट नंबर दिला. त्या खात्यावर १२ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. 

भाटीयांनी १२ हजार पाठवल्यानंतर त्याच्याशी संपर्क केला असता मला तुम्हाला २४ हजार द्यायचे असून तुम्ही पुन्हा १२ हजार रुपये पाठवा असे सांगितले. पैसे पाठविल्यावर काही वेळानंतर भाटिया यांनी त्यांच्याशी संपर्क करून पैसे पुन्हा खात्यात टाकण्यास सांगितले असता तुम्ही अजून २५ हजार पाठवा तेव्हा मी तुम्हाला पैसे टाकेल अशी उडवाउडवीची उत्तरे तो देऊ लागला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने भाटिया यांनी त्याच्या खात्यावर पुन्हा पैसे टाकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक सहाय्यक निरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.