⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

यावल शहरात जीडीसीसी बँकेजवळ त्रिकुटाची कुटुंबास मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । यावल शहरातील जेडीसीसी बँकेसमोर त्रिकूटाने कुटुंबाला शिविगाळ का केल्याचा जाब विचारल्याने मारहाण केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. जेडीसीसी बँके जवळील रहिवासी विनोद बळीराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराजवळील मोहन प्रदीप बडगुजर, संगीता प्रदीप बडगुजर व डिंपल प्रदीप बडगुजर हे शिवीगाळ करत होते. फिर्यादी यांनी तुम्ही शिविगाळ का करत आहात? असे विचारल्याचा राग आल्याने तिघांनी फिर्यादी विनोद जाधव याला मारहाण केली तर भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादीच्या पत्नी दीपाली जाधव व फिर्यादी यांची आई देवकाबाई यांनादेखील यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहेत.