---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

जळगावात पुन्हा अपघात; कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले, ६० फुटांपर्यंत नेले फरफटत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२५ । जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात झाल्याची घटना रात्री घडली. गुजराल पेट्रोल पंपाकडून आकाशवाणीकडे सुसाट येणाऱ्या भरधाव कंटेनरने शिव कॉलनी स्टॉप ओलांडणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देऊन सुमारे ६० फुटांपर्यंत नेल्याने फरफटत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. विजय नामदेव भोई (वय ५०) असे मृताचे नाव आहे.

JL Accident

या घटनेबाबत माहिती अशी की, आशाबाबा नगरातील विजय भोई यांची शिव कॉलनी स्टॉपजवळ पानटपरी आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने शिव कॉलनी स्टॉपजवळ महामार्गावर येत असतांना गुजराल पेट्रोल पंपाकडून आकाशवाणीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या एमएम09 एजी 1138 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडले. हा अपघात झाल्यानंतर कंटेनर चालकाने सुमारे 60 फुटापर्यंत त्यांना फरफटत नेले. यात विजय भोई यांचा जागीच मृत्यू झाला. विजय भोई यांच्या पत्नीचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. आता विजय यांच्या मृत्यूमुळे भोई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

---Advertisement---

दरम्यान अपघातानंतर संतप्त झालेल्या हजारोंच्या जमावाने रस्त्यावर उतरत सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. तसेच काही तरुणांकडून कंटेनरवर दगडफेकही झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्री १२.३० वाजेपर्यंत चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment