जळगाव जिल्हाराजकारण

दूध संघात अपहाराचा गुन्हा दाखल : खडसेंच्या अडचणीत वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । जिल्हा दूध संघात घोटाळा प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपहाराची तक्रार पोलिसात दिली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामुळे खडसेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात रात्रभर आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. यामुळे खडसेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे या घोटाळयात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळ अन्य याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अधिक माहिती अशी कि, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष्या मंदाकिनी खडसे या आहेत. ज्या खडसेंच्या पत्नी आहेत. आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Back to top button