⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

जागतिक महिला दिनानिमित्त मोफत हिमोग्लोबिन व रक्‍तगट तपासणी शिबिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि ८ मार्च रोजी डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स आणि इंडियन रेडक्रॉस सोसा सयुक्‍त विदयमाने विदयार्थी व कुटुंबातील व्यक्‍ती तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत रक्‍तगट व हिमोग्लोबिन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तहसिल कचेरी बळीराम पेठ येथे डॉ. वर्षा पाटील वुमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयाच्या परिसरात दु २ ते ३ यावेळेत हे शिबिर आयोजित केले. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य उज्वला मावळे आणि इंडियन रेडक्रॉस सोसाच्या उज्वला वर्मा यांनी केले आहे.