९ किलो वजनाची पितळी घंटा चोरीला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । यावल तालुक्यातील साकळी येथील श्री वाडेश्वर मंदिरातील पितळी घंटा चोरीला गेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याची किंमत ९ हजार रुपये होती.

crime 8

साकळी येथे मनवेल रस्त्यावर श्री वाडेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात प्रवेशद्वाराच्या समोरील भागात गणपतीच्या मूर्ती जवळ नऊ किलो वजनाची पितळी घंटा लावली होती. गुरुवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यावर ही घंटा चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. या मुद्देमालाची किमत सुमारे ९ हजार रुपये आहे. यापूर्वी देखील मनवेल रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरातील पितळी घंटा चोरीला गेली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now