एकनाथ शिंदेंना मोठा धक्का : जिल्हाप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला पण खूप मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाप्रमुखाने तडका फडकी राजीनामा दिला आहे. यामुळे हा धक्का मोठा समाजाला जात आहे.

शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून उद्धव ठाकरे यांना हादरे दिले आहेत. राज्यातील ४० पेक्षा जास्त आमदार आणि १३ खासदार त्यांनी आपल्याकडे वळवले आहेत. मात्र आता पहिल्यांदात त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

यवतमाळचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर बेजंकीवार यांनी पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिल्याची माहीत आहे. बेजंकीवार शिंदे गटातील मंत्री संजय राठोड यांच्या जवळचे मानले जातात. तरी त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राठोड यांचा हात धरून बेजंकीवारही शिंदे गटात सामील झाले होते.