---Advertisement---
बोदवड

जामठीत ५५ हजारांसह पिशवी चोरीला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । बोदवड तालुक्यातील जामठी येथील रहिवासी गोपाल मुकुंदा गोरे हे बस स्थानकावरून पेट्रोल भरण्यासाठी जात होते. यादरम्यान दुचाकीच्या हुकाला लावलेली प्लास्टिकची पिशवी तुटून खाली पडली. त्यात गोपाल गोरे यांचे ५५ हजार ४०० रुपयांसह मोटारवाहन चालक परवाना, चारचाकी वाहनाचे कागदपत्रे, एटीएम कार्ड, आधार व पॅनकार्ड अशी कागदपत्रे होती. ही घटना २४ रोजी रविवार रोजी सकाळी १०.२० वाजेदरम्यान घडली.

crime 8

ही पिशवी पडली की? कुणीतरी चोरली याबाबत संभ्रम आहे. या प्रकरणी गोपाल गोरे यांनी बोदवड पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा बोदवड पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---