⁠ 
सोमवार, मे 20, 2024

चाळीसगाव तालुक्यातील ४८ वर्षीय शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील ४८ वर्षीय शेतमजुराचा शनिवारी दुपारी अकस्मात मृत्यू झाला. सुंंदरलाल गढरी (वय ४८) असे मृत शेत मजुराचे नाव आहे. या मजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून उष्णाघाताचा हा तालुक्यातील पहिला बळी ठरला आहे.

काही दिवसांपासून उष्णतेचा पारा सतत वाढत आहे. यामुळे अंगाची लाही-लाही होत असून सामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा आधार घेत आहेत. शहरासह ग्रामीण भागात जवळपास ४१ अंश सेल्सियसवर पारा गेला आहे. अशा स्थितीत सर्वच जण उष्णतेने हैराण झाले आहेत. तालुक्यातील मेहुणबारे येथील सुंंदरलाल सुकदेव गढरी (वय ४८) हे शेतमजुर शनिवारी सकाळी नित्याप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी मेहुणबारे परिसरात गेले हाेते. दुपारी दीड ते पावणेदोन वाजेच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने ते घरी परतले. त्यांना डाॅक्टारांकडे नेत असतानाच त्याचा अचानक मृत्यू झाला. खाजगी डाॅक्टरांनी त्यांची तपासणी करुन हा उष्माघाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली.

परिस्थिती गरिबीची

मृत गढरी यांची घरची परिस्थिती गरिबीची होती. मजुरी तसेच बकऱ्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. मृत गढरी यांच्या पश्चात पत्नी व १ मुलगा आहे.