४५ वर्षीय प्रौढाची गळफास घेत आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । भुसावळात ४५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्या घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. सदर व्यक्ती अविवाहित असून घरी वडील, लहान भाऊ परिवारासह राहतात. बुधवारी घरी कोणीही नसतानात्यांनी छताला दोरी बांधून गळफास घेतला. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हेमचंद्र दिगंबर गाजरे (45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहरातील जुने सतारे भागातील खळवाडी परीसरात ते आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ते अविवाहित असून बुधवारी घरी कोणीही नसताना त्यांनी छताला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार परीसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातून सहायक फौजदार अनिल चौधरी, सागर देहाडे हे घटनास्थळी आले. पंचनामा करून गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरवून ट्रामा केअर सेंटरमध्ये विच्छेदनासाठी रवाना केला. तेथे शवविच्छेदन होऊन मृतदेह हा नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. डॉ.मिलिंद जावळे यांच्या खबरीवरून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.