---Advertisement---
गुन्हे भुसावळ

भुसावळ शहर खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले ; तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२३ । भुसावळ शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरला आहे. पूर्व वैमनस्यातून ३१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना आज रविवारी सकाळी शहरातील खडका रोड परिसरात घडलीय. नाजीर शेख नशीर ( वय ३१) असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

murder raver

एकीकडे जिल्ह्यातील गंभीर गुन्हेगारांवर हद्दपारी तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाईचे सत्र सुरु असले तरी गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

---Advertisement---

नेमकी काय आहे घटना?
भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात पूर्व वैमनस्यातून नाजीर शेख नशीर या तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसर हादरला असून तरूणाच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---