डांभुर्णीत ३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेत संपवली जीवनयात्रा!

जुलै 28, 2022 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे घरातील पती व सासरे कामानिमित्त बाहेर, मुले शाळेत गेली असताना ३३ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. याबाबत यावल पोलिसांत अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

yawal death

अर्चना राजेंद्र कोळी (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या डांभुर्णी येथील मुख्य चौकाजवळ आपल्या कुटुंबियांसह वास्तवास होत्या. बुधवारी रोजी पती व सासरे कामानिमित्त बाहेर, तर मुले शाळेत गेली असताना त्यांनी आत्महत्यांचे पाऊल उचलले. दुपारी त्यांचा मुलगा शाळेतून घरी परतला. यावेळी त्याला अर्चना कोळी या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या. यानंतर त्याने वडिल राजेंद्र बळीराम कोळी यांना शोधून ही माहिती दिली. पोलिसांना देखील कळवण्यात आले.

यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. येथे डॉ.शुभम देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवला. मृत अर्चना कोळी यांचे माहेर गुजरात राज्यातील सुरत येथील आहे. त्यांना दोन मुली, एक मुलगा अशी अपत्ये आहेत. त्या कुटुंबातील संपूर्ण जबाबदारी पार पाडायच्या. चार दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी औषधोपचार केला होता. या प्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now