चिंचोलीच्या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

जुलै 5, 2022 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । यावल तालुक्यातील चिंचोली येथील तरुण भुषण संतोष पाटील (वय २४) याने राहत्या घरात दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले असताना त्याने ही आत्महत्या केली. दरम्यान या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

succide 7 jpg webp

भुषण पाटील हा तालुक्यातील चिंचोली येथे आईवडीलांसह राहत होता. अहमदाबाद येथे तो एका खासगी कंपनीत नोकरीला होता. गेल्या महिन्यापासून भुषण हा चिंचोली येथे आलेला होता. सोमवारी दि. ४ जुलै रोजी सकाळी त्याचे आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. त्यावेळी भुषण हा घरी एकटाच होता. घरात कुणीही नसताना त्यांना राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच आईवडीलांना एकच आक्रोश केला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now