जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । जळगाव शहरात एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणीला वारंवार फोन करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी कि, जळगाव शहरात राहणारी २० वर्षीय तरुणी एका गर्ल्स हॉस्टेल येथे वास्तव्यास आहे. सध्या हि तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शनिवारी १०जून रोजी सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्र खेडकर याने तरुणीच्या फोनवर कॉल केला.
त्यानंतर तिचा दुचाकीने पाठलाग करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रविवार ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी रवींद्र खेडेकर यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे.