पिंपळकोठा येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळविले

एप्रिल 19, 2022 3:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणी तरी फूस पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी येथील पोलिसांत तक्रार दिली आहे.

crime (1)

अधिक माहिती अशी की, तालुकयातील पिंपळकोठा येथे राञीचे जेवण झाल्यानंतर घरात सर्वजण झोपले असताना घरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली. तिचा सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला कुणी तरी अज्ञात इसमाने आमीष दाखवुन पळवुन नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी येथील पोलिसांत हरविल्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलिस हेड काँन्सटेबल विलास पाटील हे करीत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now