जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । शहरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कुटुंबिय हे मुळ रहिवाशी आकोला जिल्ह्यातील आहे. बांधकामाच्या निमित्त जळगावला वास्तव्याला आहे. शनिवारी ९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू कोठेही आढळून आली नाही.
मुलीच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.