सोने-चांदीत पुन्हा वाढ! एकाच दिवसात ‘इतक्या’ रुपयांनी महागले.. पहा आताचे दर

मे 28, 2024 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्याची सुरुवाती दरवाढीने झाले. सोने आणि चांदीने भाववाढीची सलामी दिली. जळगाव सुवर्णपेठेत सोन्याच्या दरात २०० रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल एक हजार रुपयांची वाढ झाली. Jalgaon Gold Silver Rate 28 May 2024

GS Price jpg webp

यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७२,४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. तर चांदीचा विनाजीएसटी दर ९१,००० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने ७५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात जळगावात सोन्याच्या दरात तब्बल २९०० रुपयापर्यंतची घसरण झाली.

दुसारिखे चांदीत देखील मोठी घसरण दिसून आली. ९४ हजार रुपयावर गेलेला चांदीचा दर ९० हजारावर आला होता. अशाप्रकारे चांदी दरात जवळपास ४ हजार रुपयाची घसरण दिसून आली. मात्र काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी एक हजाराने महागली.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now