छत्रपती शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा 12वी परीक्षेत 100% निकाल

मे 22, 2024 12:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । जळगाव येथील “मंगलमुर्ती बहुउद्देशीय संस्थेचे” छत्रपती शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा फेब्रु-२०२४ च्या बारावी परीक्षेचा निकाल १००% लागला असून महाविद्यालयातून ९०.१७ मिळवून प्रथम क्रमांक पाटील हर्षल प्रदीपकुमार या विद्यार्थ्याने मिळवला आहे, तसेच ८९.५० % मिळवून द्वितीय क्रमांक साळुंखे मृदुला श्याम, ८८.६७% मिळवून तृतीय क्रमांक शिरुडे मुग्धा किशोर, ८८.३३% मिळवून चतुर्थ क्रमांक पाटील अर्पित नंदकिशोर, व ८८.१७% मिळवून पाचवा क्रमांक सोनवणे उत्कर्ष राहुल यांनी पटकावला.

result jpg webp

तसेच ८५ % च्या वरती ३० विद्यार्थी व ७५% च्या वरती २६८ विद्यार्थ्यांनी गुण मिळविले. तसेच संस्कृत या विषयात पाटील दिशा किशोर आणि आय. टी. या विषयात येवले सिद्धेश प्रशांत यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले.

विशेष प्राविण्य मिळवून सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत. नेहमी प्रमाणे यावर्षीही उत्कृष्ठ निकालाची परंपरा छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाने कायम ठेवली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. व्ही. पाटील सर, सचिव सौ. मालती आर. पाटील मॅडम व प्राचार्य प्रा. समाधान धनगर सर, तसेच सर्व प्राध्यापक वृंद व सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now