जळगावच्या गोदावरी स्कूलचीही यशस्वी परंपरा कायम
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२४ । जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. इयत्ता दहावी मधील हर्ष सुनील राजपूत ९६ टक्के, नुपूर किरण चौधरी ९३ टक्के, श्रेया महेश कोल्हे. ९२ टक्के, विद्या धोंडू गव्हाले ९२ टक्के, अनिकेत मनोज कुमार सिंग ८९ टक्के, अंजार जफर देशमुख ८९ टक्के, सोहम शामकांत भंगाळे ८९ टक्के, पुष्पल भूषण फेगडे ८८.२ टक्के, प्रणव चंदन पाटील ८८ टक्के, रिया हेमंत तारकस ८७.२ टक्के, बेलदार जैद शकील ८७ टक्के, शैलेश किशोर झांबरे ८६.२ टक्के गुण प्राप्त केले.
तसेच इयत्ता बारावीमध्ये प्रेषित प्रशांत वारके ९१.४ टक्के, हेमंतकुमार शिवपाल सैनी ८१ टक्के, गुण प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आदरणीय गोदावरी आजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ.केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा चौधरी व सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.